Congress Candidate List 2024 : काँग्रेसकडून 39 उमेदवारांची यादी जाहीर; राहुल गांधी कुठून लढणार पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Congress Candidate List 2024 | लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या कामाची गती वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 39 उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यानुसार, स्वतः राहूल गांधी (Rahul Gandhi) वायनाड (Wayanad) येथून उभे राहणार असल्याचे समोर आले आहे.

कोण-कोण कोठून उभे राहणार? Congress Candidate List 2024

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत 39 उमेदवारांची नावे आहेत. यात छत्तीसगमध्ये 6, कर्नाटकात 7,
केरळमध्ये 16, लक्षद्वीपमध्ये 1, मेघालयात 1, नागालँडमध्ये 1, सिक्कीममध्ये 1, तेलंगणात 4 आणि त्रिपुरात 1 उमेदवार उभा राहणार आहे. यासह राहुल गांधी वायनाडमधून, शशी थरूर तिरुअनंतपुरममधून, केसी वेणुगोपाल अलप्पुझामधून, भूपेश बघेल राजनांदगावमधून, व्हिन्सेंट पाला तर मेघालयमधून आशिष साहा त्रिपुरा पश्चिममधून निवडणुक लढवणार आहे.

मुख्य म्हणजे, काँग्रेसच्या पहिल्या यादीत मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, या यादीत खुल्या प्रवर्गातून 15, महिला 3, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी व अल्पसंख्याक समुदायातील 24 उमेदवारांची नावे आहेत. याचबरोबर , यंदा काँग्रेसने केरळमध्ये उभ्या राहणाऱ्या सर्वच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये अलपुझ्झामधून पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून जाहीर करणाऱ्या यादीत महाराष्ट्राचा उल्लेख नाही. कारण की, अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या जागांचा विषय दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. त्यामुळे जोपर्यंत हा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करणार नाही, असे स्पष्ट सांगितले जात आहे.