बाळासाहेब यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनाच धोका द्यायचा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची शिंदे गटावर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Andheri East Assembly By-Election) सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपाला बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र आता यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभेची जागा (Andheri East Assembly By-Election) ही शिवसेनेची असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपला उमेदवार उभा न करता भाजपाच्या उमेदवाराला पांठिबा देण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील उमेदवारीबाबत काही प्रश्न उपस्थित करत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अतुल लोंढे?
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब यांचं नाव घायचं आणि बाळासाहेब यांनाच धोका द्यायचा असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली. तुम्ही जर स्वत:ला शिवसेना मानता, भाजप देखील म्हणत की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. तर मग अंधेरी पूर्व विधानसभेची जागा (Andheri East Assembly By-Election) ही शिवसेनेची असताना तुम्ही तुमचा उमेदवार का उभा केला नाही. भाजपच्या उमेदवाराला का पाठिंबा दिला, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!