काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणांमध्ये ते दोषी आढळल्यामुळे त्यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असणाऱ्या नागपूर जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे सुनील केदार यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनील केदारे यांच्यासह सहाजण दोष आढळले असता त्यातील तीन जणांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. खरे तर हिवाळी अधिवेशनामुळे या खटल्याचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. मात्र अखेर आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्यात सुनील केदार दोषी आढळले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 रोजी 152 कोटी रुपयांचा होम ट्रेन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी माजी मंत्री सुनील केदार या बँकेचे अध्यक्ष होते. ते या खडल्याखालील मुख्य आरोपी होते. त्यावेळी बँकेच्या रकमेतून होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. हा सर्व व्यवहार सरकारी नियमांचे उल्लंघन करत करण्यात आला होता. पुढे जाऊन ही कंपनी दिवाळीखोर झाल्यामुळे यात शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. याप्रकरणीत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य म्हणजे या प्रकरणात चार राज्यात एकूण 19 ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. अखेर बराच काळ हा खटला सुरू राहिल्यानंतर अखेर आज सुनील केदार त्यात दोषी आढळले आहेत.