26/11 हल्ल्याच्या मागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात? भाजपच्या आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

2611 (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या 26/11 च्या भयावह दहशतवादी हल्ल्याबाबत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी (20 एप्रिल ) ला एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी असा आरोप केला की, “या हल्ल्याच्या मागे तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा वाटा होता.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या वक्तव्यामुळे अनके ठिकाणी चर्चा होताना दिसत आहेत. तर चला या माधव भंडारी (Madhav Bhandari) यांचा खळबळजनक आरोपाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

माधव भंडारी यांचा खळबळजनक दावा –

माधव भंडारी यांच्या हस्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष ठरलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. भंडारी म्हणाले, “इतका मोठा हल्ला स्थानिक प्रशासनातील सहभागाशिवाय होऊ शकत नाही. हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती आधीपासूनच सरकारकडे होती. तरीही हा हल्ला रोखण्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले –

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “जर कोणी गंभीर आरोप करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आज राज्य आणि केंद्रात आपलेच सरकार आहे. पोलिस यंत्रणाही आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.” अजित पवार पुढे म्हणाले, “26/11 हल्ल्याच्या वेळी मी गृहमंत्री नव्हतो. त्या काळातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. मी काही बोललो त्याचा अर्थ कोणी काय घ्यायचा, हे त्यांच्या इच्छेवर आहे.”

माध्यमांसमोर स्पष्टीकरण –

राजकीय वातावरण तापल्यानंतर माधव भंडारी यांनी सोमवारी पुन्हा माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलं. “काल मी जे भाषण केलं त्याचा विपर्यास करण्यात आला. मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडात घातलं गेलं,” असं भंडारी म्हणाले. तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “हल्ल्याच्या पाच महिने आधीच केंद्र सरकारला हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली होती. हल्ल्याचे 85% तपशील अगोदरच कळले होते. अशा परिस्थितीत जर सरकारकडे माहिती होती, तरी हल्ला रोखण्यात ते अपयशी ठरले, ही गंभीर बाब आहे.”