व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस चौकशी करणार : पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले असा धक्कादायक खुलासा तांबे यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत. त्यातच आता सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपाची काँग्रेस चौकशी करेल असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

कराड येथे काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण याना सत्यजित तांबे यांच्या आरोपांबाबत विचारलं असता, सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस कमिटी चौकशी करेल असं त्यांनी म्हंटल. काँग्रेसमध्ये भरपूर लोकशाही आहे, हीच खरी अडचण आहे. अनेकांनी शिस्तही पाळणे गरजेचे आहे‌‌. चर्चा करणे गरजेचे होते परंतु या सर्वाची आता चौकशी होईल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलायचा की नाही हे रायपूरच्या महाअधिवेशनात ठरेल असं सांगत अशा प्रकारच्या चर्चा थांबल्या पाहिजेत असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

सत्यजित तांबे यांचे नेमके आरोप काय-

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर सत्यजित तांबे यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आपल्याला पक्षाने जे २ एबी फॉर्म दिले त्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा उल्लेखच नव्हता तर औरंगाबाद आणि नागपुर मतदार संघाचे फॉर्म होते असा खळबळजनक खुलासा सत्यजित तांबे यांनी केला. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी बाळासाहेब थोरात याना अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले. मी तरीही काँग्रेसकडून च फॉर्म भरला होता मात्र एबी फॉर्म नसल्याने माझा अर्ज अपक्ष मध्ये कन्व्हर्ट झाला अशी माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा?, असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी केला.