दैवी चमत्कार!! लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात भगवान विष्णूंना सूर्यकिरणांचा सोनेरी अभिषेक; पहा फोटो

0
4
Thenudan Temple
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात अनेक प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. ज्यांचे इतिहास, आख्यायिका ऐकण्यासारख्या आहेत. प्रत्येक मंदिराची काही ना काही खासियत आणि वैशिट्य आहेत. अशाच एक खास मंदिराबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. लोणार हे सर्वश्रुत ठिकाण आहे. उल्कापाताने तयार झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे याविषयी आपण जाणतो. मात्र, सरोवराच्या परिसरात इतरही अशा अनेक पौराणिक वास्तु आणि मंदिरे आहेत त्यांपैकी एक अत्यंत खास मंदिर आहे. ज्याला दैत्यसूदन मंदिर म्हणून ओळखतात. हे मंदिर देखील लोणारच्या ओळखीचे कारण आहे. जाणून घेऊया या मंदिराविषयी.

लोणारचे दैत्यसूदन मंदिर

दैत्यसूदन मंदिर हे लोणार नगरीची मोठी ओळख आहे. या मंदिरात स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम पहायला मिळतो. दैत्यसूदन मंदिर हे नवव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्यशैलीतील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भगवान विष्णू यांचे असून इथे त्यांची भव्य तसेच आकर्षक मूर्ती पहायला मिळते. या मूर्तीचे खास वैशिट्य म्हणजे, भगवान विष्णू यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला होता तो त्यांच्या पायाखाली आहे.

भगवान विष्णूंना सूर्यकिरणांचा अभिषेक

गेल्या दोन दिवसात या मंदिरात एक अद्भुत नजारा पहायला मिळाला. बरोबर सकाळी ११.१० ते ११.३० या वेळेत भगवान विष्णूंच्या मुकुटावर सूर्य किरणांची एक विशेष क्रीडा पहायला मिळाली. भगवान विष्णूंच्या मूर्तीवर मुकुटापासून ते पायापर्यंत सूर्य किरणांनी अभिषेक घातल्याचा नजारा पाहून अनेकांनी दैवी प्रचितीचा अनुभव घेतला.

कोरीव अन अद्भुत शिल्पकलेतून साकारलेले मंदिर

लोणारचे दैत्यसूदन मंदिर हे फार प्राचीन आहे. लोणार धार येथील हे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे. क्रेप पेपरला घड्या घालाव्या अशा या मंदिराच्या बांधकामात दगडाला घड्या घातल्याचे दिसते. हे मंदिर खरोखरच एक अद्भुत शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्यशैलीच्या आधारावर या मंदिराची रचना करण्यात आली आहे. या मंदिराचे बाहेरील काम अत्यंत कोरीव असून पाहण्यासारखे आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हे मंदिर पहायला आवर्जून येतात.