ऐका! सतत चिडचिड होणे, राग येणे असू शकतात ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेचे परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास त्या गोष्टीचा राग येणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जर राग आणि चिडचिड सतत होत असेल तर ही एक शरीराशी जोडलेली गंभीर समस्या असू शकते. काही लोक आपल्याला सतत चिडचिड करताना किंवा राग धरताना दिसतात. परंतु त्यांचा हा राग आणि चिडचिड थेट त्यांच्या शरीरात कमी असलेल्या व्हिटॅमिन जोडलेली असते. हे व्हिटॅमिन शरीरात कमी असल्यावर आग कसा येतो हेच आपण जाणून घेणार आहोत.

छोट्या छोट्या गोष्टींवर एखाद्या व्यक्तीला जर सतत राग आणि चिडचिड होत असेल तर त्याला संबंध शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी जोडलेला असतो. व्हिटॅमिन बी 6 आणि जीवनसत्त्वांची कमतरता असलेल्या लोकांना सतत राग येत असतो. तसेच इतर गोष्टी देखील रागाला कारण ठरू शकतात.

व्हिटॅमिन बी 6 कमी असणे

व्हिटॅमिन बी 6 आपल्या शरीरात मेंदूच्या रसायनांप्रमाणे काम करत असते. मेंदूचे कार्य सुधारण्यास व्हिटॅमिन बी 6 खूप मदत करते. परंतु हेच व्हिटॅमिन कमी असल्यामुळे फिल गुड हार्मोनची कमतरता उद्भवते. ज्यामुळे व्यक्तीला राग येण्यास सुरुवात होते.

व्हिटॅमिन बी 12 कमी असणे

शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमी असल्यामुळे थकवा आणि सुस्त जाणवू शकते. त्यामुळे एखादे काम करताना चिडचिडपणा जास्त होतो. तसेच, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे नैराश्य देखील जाणवू शकते.

या कारणांमुळेही चिडचिडपणा होतो

झिंकची कमतरता

मूड सतत बदलण्यास आणि चिडचिड होण्यास एक कारण असते ते म्हणजे झिंकची कमतरता. अजिंक आपल्या शरीरात कमी असल्यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते. तसेच नैराश्य देखील जाणवू शकते.

मॅग्नेशियमची कमतरता

तणावाचे व्यवस्थापन निर्माण करण्यास मॅग्नेशियमची महत्त्वाची भूमिका बजावत असते. परंतु मॅग्नेशियमच कमी झाले तर तणाव वाढत जातो. यामुळे आपली छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होऊ शकते.