आता महिलांना कायदेशीररित्या करता येणार गर्भपात; ‘या’ सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जागतिक महिला दिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या सरकारने महिलासंबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. “महिलांनी मूल जन्माला घालायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार त्यांना आहे हे मुल त्यांना नको असल्यास ते गर्भपाताचा (Abortion) देखील निर्णय घेऊ शकतात” असे स्वातंत्र्य सरकारकडून महिलांना देण्यात आले आहे. म्हणजेच सोमवारी फ्रान्सच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालेल्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधी विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

फ्रान्स महिलांना गर्भपात करण्यासाठी घटनात्मक अधिकार (Constitutional Right) देणारा पहिला देश ठरला आहे. सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात गर्भपायासंबंधीत कायद्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानंतरच फ्रान्समधील महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार मिळावा यासाठी फ्रान्सच्या राज्यघटनेतील 34 कलमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे बदल करण्यापूर्वी नॅशनल असेम्ब्ली आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करण्यात आली होती.

यानंतरच हे सुधारणा विधेयक सभागृहात बहुमताने पारित करण्यात आले. या विधेयकाला पारित करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये तीन पंचमांश बहुमताची आवश्यकता होती. हे बहुमत सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आले. यानंतरच या विधायकाचे सुधारित कायद्यात रूपांतर झाले. परंतु सरकारने महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार दिला असला तरी यातील सर्वच महिला गर्भपात करू शकणार नाहीत. काही ठराविक महिलांनाच गर्भपात करण्याचा अधिकार असेल.

कोणत्या महिलांना गर्भपाताचा अधिकार असेल?

गर्भपात करण्याची महिलांकडे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. परंतु तत्वांची कमतरता, कमकुवत गर्भाशय, संसर्ग, लैंगिक संक्रमण रोग आणि पीसीओएस अशा काही ठराविक कारणांसाठीच महिला गर्भपात करू शकतात. याव्यतिरिक्त कोणत्याही महिलेवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येणार नाही.