हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. सरकार देखील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आणि सोयीसुविधा आणत असतात. या बांधकाम कामगार त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अशातच आता ऐन गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता सरकारकडून हे अर्थसहाय्य आता दुप्पट होणार आहे. बांधकाम कामगारांना एक लाख रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे.
यानुसार आता जिल्हा नियोजनाच्या निधीतूनच अनुसूचित जाती तसेच जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत सौर विद्युत संसदेच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन मधील अनुसूचित जाती तसेच जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते प्रकाश व्यवस्था यांसारखी कामे करण्यात येणार आहेत. तसेच या कामांच्या ते पुनरावृत्ती होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौर घर योजने अंतर्गत फायदा होतो. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर पंप तसेच विहिरी देण्यासाठी आता परवानगी देण्यात यावी असे देखील फडणवीस यांनी सांगितलेले आहे.
या बैठकीमध्ये फडणवीस यांनी सांगितले की, आदिवासी गावांमध्ये जंगली प्राणी आहेत. त्यांच्या बचावासाठी कुंपण देण्यात यावे. तसेच बांधणे देखील शासन निर्णय जाहीर करावा. मानव विकास निधीची कामे राज्यामध्ये 125 तालुक्यांमध्ये करण्यात येतात. यासाठी देखील मान्यतेचे अधिकाराचा जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हा नियोजन निधीतील कामांचे तांत्रिक मान्यता प्रस्ताव मंजुरीचे अधिकार आता जिल्हा स्तरीय यंत्रणाकडे देण्यात आले आहे. तसेच आता या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना अर्ज त्याची कामे 21 दिवसाच्या आत करावी असे देखील सांगितले आहे.