ठाण्यात भीषण अपघात! कंटेनरला ट्रकने दिली धडक; चालकाला वाचवण्यात आले यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील कॅडबरी कंपनीजवळ रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला अपघातग्रस्त (accident) ट्रकने जोरदार धडक दिली. शुक्रवारी रात्री 11 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ हा अपघात (accident) झाला. या अपघातात ट्रकचालक दिनेश सोलकर हे अपघातग्रस्त (accident) ट्रकमध्ये अडकून पडले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी ट्रक चालक सोलकर हे ठाण्यातील वागळे इस्टेट, सीपी तलाव येथे राहणारे आहेत. ते आपला रिकामा ट्रक घेऊन तीन हात नाका येथून मुंबई-नाशिक महामार्गे भिवंडी पडघा या ठिकाणी जात होते. कॅडबरी जवळ आल्यावर त्यांनी आपल्या ट्रकने समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनर मागून जाऊन धडक दिली. तो कंटेनर वाशीहून भाईंदरला 15 टन बर्फाच्या लाद्या घेऊन जात होता.

या अपघातानंतर ट्रकचालक सोलकर हे ट्रकमध्येच अडकून पडले होते. या अपघाताची (accident) माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी सोलकर यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!