कंटेनरच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, बुलढाणामधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा शहरामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (accident) घडली आहे. यामध्ये बुलढाणा शहरातील चिखली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत (accident) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

काय घडले नेमके?
सुमेध कहाळे असे या अपघातात (accident) मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर श्रावण हेलोडे असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हे दोघेही बुलडाणा शहरातील भीमनगर भागातील रहिवाशी होते. मृत सुमेध हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सुमेध दुचाकीने आपला मित्र श्रावण याच्यासोबत चिखलीकडून बुलडाण्याकडे जात होता.

यादरम्यान चिखली रोडवर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने सुमेधच्या दुचाकीला जोरदार धडक (accident) दिली. या धडकेमुळे सुमेध हा कंटेनरच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर श्रावण हा बाजूला पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. तसेच आरोपी कंटेनर चालक घटनास्थळावर कंटेनर उभा करून फरार झाला आहे. पोलिसांकडून आरोपी कंटेनर चालकाचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर