…. तर आज श्रीकृष्ण आणि रामाला तुरुंगात टाकलं असत; प्राध्यापकाचे वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अलाहाबाद विद्यापीठाच्या एका सहायक प्राध्यापकाला श्री राम यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणे चांगलेच भोवले आहे. इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांनी भगवान श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत वादग्रस्त केल्यामुळे बजरंग दलाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, डॉ. विक्रम हरिजन यांना निलंबित करण्यात यावे, अशी देखील मागणी करण्यात आली आहे. यासर्व प्रकरणामुळे अलाहाबाद विद्यापीठ सोशल मीडियावर चर्चेचा भाग बनले आहे.

नेमकं काय झालं?

डॉ. विक्रम हरिजन हे अलाहाबाद विद्यापीठात इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी X वर श्री राम आणि श्री कृष्णबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हणणे होते की, ‘आज जर भगवान श्रीराम हयात असते तर मी त्यांना ऋषी शंभूकच्या हत्येप्रकरणी आयपीसीच्या कलम 302 अन्वये तुरुंगात पाठवले असते आणि कृष्ण आज हयात असते तर मी त्यांना महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात तुरुंगात पाठवले असते” विक्रम केलेल्या यांनी केलेल्या या वादग्रस्त पोस्टमुळे आज त्यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर, विक्रम यांच्याविरोधात बजरंग दलासह विविध हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

https://twitter.com/ProfDrVikram1/status/1715912630186209433?t=8SFfcAAxYfAGsQYHuxLgPQ&s=19

दरम्यान, विक्रम हरिजन हे गोरखपूरचे रहिवासी आहेत. ते सध्या अलाहाबाद विद्यापीठाच्या इतिहास विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी देखील प्रोफेसर विक्रम यांनी हिंदू देवी-देवतांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यामुळे विद्यापीठात मोठा गोंधळ उडाला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांचा संताप पाहून विक्रम यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता प्राध्यापक विक्रम यांनी थेट श्री राम आणि श्री कृष्ण यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच, यामुळे विद्यापीठातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे.