हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात बोलतानाच कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केली आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता कालीचरण महाराज यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कालीचरण महाराज काय म्हणाले??
आपल्या व्याख्यानात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की , “जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा देखील वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही. देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो अंनाद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद हा मिळाला पाहिजे. टार्गेट पूर्ण करून देणारं टार्गेट म्हणजे धर्म आहे”
त्याचबरोबर, “सध्याची परस्थिती आता दिसत आहे. पूर्वी काय होती आणि आता काय आहे? ह्या परस्थितीची परिपूर्ण जाणीव करून देतो. माणुसकी आपल्याला धर्म शिकवणार आहे. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे , पिणे, झोपणे, सेक्स करणे हे लक्षण पशूमध्ये असतात. ढोरांमध्ये आणि माणूस ही या गोष्टी करतो.” असेही कालीचरण महाराज यांनी म्हणले आहे.
दरम्यान, हिंदू धर्माबाबत बोलताना “देवी मानणारे ईश्वर मानत नाही. इस्लाम आणि ख्रिश्चन पुनर्जन्म मानत नाही ते धर्म नाही. मी कुराणाचा ब्रँड अँबेसिडर आहे , मुस्लिम लोकं जो प्रचार करत नाही तो मी करतो. येशूने खिळे ठोकून घेतले आणि पूर्ण जगाचे पापा फेडून घेतले. हिंदू म्हणजे काय? अच्छे को छेडना नाही बुरे को छोडणा नाही. काही हरामखोरांनी म्हटलं इकडे मारलं तर इकडेही मारून घ्या. चु** बनण्याचा उद्देश देऊन देशाचा सत्यानाश केला.” असे कालीचरण महाराज म्हणाले.