हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) ललित कला केंद्रात रामायणावरून तुफान राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी ललित कला केंद्रातील (Lalit kala Kendra) विद्यार्थ्यांनी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. परंतु या प्रयोगात घेतलेले रामायणातील पात्रच आक्षेपार्ह असल्याचे बोलत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच नाटक देखील बंद पाडले. इतकेच करुन न थांबता आभाविपच्या कार्यकर्त्यांनी कलाकारांना मारहाण केल्याचा आरोप ही विद्यार्थ्यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर पुणे विद्यापीठात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेकमे काय घडले?
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून संध्याकाळी एका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. हे नाटक रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित होते. या नाटकांमधून “जब वी मेट” नाटकात रामायणामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या नाटकामध्ये सीतेचा आणि श्री राम यांचा अपमान झाल्याचे अभाविपच्या कार्यकर्त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी नाटकाचा प्रयोग उधळून लावला.
इतकेच नव्हे तर, हे नाटक बंद पाडल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाटकातील कलाकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
पुढे, कलाकारांनी सादर केलेल्या नाटकावर निषेध नोंदवत नाटकात सहभागी असणाऱ्या प्राध्यापकांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे शुक्रवारी पुणे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच दोन्ही गटांनी आमने-सामने येऊन चांगलाच गोंधळ घातला. विद्यापीठात घडलेले या सर्व प्रकारानंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाटकात काय दाखवण्यात आले?
ललित कला केंद्र कडून सादर करण्यात आलेल्या नाटकांमध्ये जब वी मेट या नाटकात रामायण काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्यात आले. ललित कला केंद्राचा विद्यार्थी भावेष राजेंद्र याने हे नाटक दिग्दर्शित केले होते. या नाटकामध्ये श्रीराम आणि सीता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आले. तसेच श्रीराम यांना राखी सावंत आणि देवी देवतांच्या पात्रांच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आले.