Cooking Tips : वर्किंग वुमन्ससाठी 100% फायदेशीर ठरतील ‘या’ स्मार्ट कुकिंग टिप्स; लगेच जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cooking Tips) प्रत्येक स्त्री आपलं घर अत्यंत प्रेमाने, काळजीने आणि जबाबदारीने सांभाळत असते. आपलं घर सुंदर, नीटनेटकं असावं म्हणून ती कायम धडपडत असते. तसेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती पोटभर खाऊन समाधानाने निजावं यासाठी तिची कायम धडपड सुरु असते. जसजसं जग आधुनिक होत गेलं. तसतशा स्त्रिया सुद्धा आधुनिकतेकडे आणि प्रगतीकडे वाटचाल करू लागल्या आहेत. त्यामुळे आजची स्त्री फक्त घर सांभाळत नाही तर बाहेर कामालासुद्धा जाते. असं असूनही ती घर आणि ऑफिस दोन्ही अत्यंत लीलया सांभाळते. अशा सगळ्या स्मार्ट गृहिणींसाठी आजची ही खास बातमी.

घर आणि नोकरी सांभाळताना प्रत्येक बाईची होणारी कसरत ही वेगवेगळी असते. दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तिचा दिवस कधी सुरु झाला आणि कधी संपला तिलाच कळत नाही. (Cooking Tips) रोजच्या गडबडीत किचन सांभाळताना मात्र तिची मोठी दमछाक होते. घाईघाईत कितीतरी गोष्टी उलट सुलट होतात आणि असं तुमच्याही बाबतीत घडत असेल तर चिंता सोडा. कुटुंबियांसाठी स्वयंपाक करत असताना महिलांना बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि म्हणूनच आजच्या या जबरदस्त कुकिंग टिप्स प्रत्येक वर्किंग वुमनसाठी फायदेशीर ठरणार आहेत. चला लगेच जाणून घेऊया.

1. आठवड्याभराचे मिल प्लॅन करा (Cooking Tips)

आठवडाभर तुम्ही जेवणात काय बनवणार आहात? याचा एक चार्ट बनवून किचनमध्ये लावा. त्यानुसार एकदाच आठवड्याच्या भाज्यांची खरेदी आणि आवश्यक पदार्थ घेऊन या. ते फ्रिजमध्ये स्टोअर करा. विकेंडला १ – २ तास या कामासाठी दिल्याने तुमचा आठवड्याभरात बराच वेळ वाचतो.

2. भाज्या कापून सोलून फ्रिजमध्ये स्टोअर करा

सकाळी गडबडीत भाज्या कापणे किंवा सोलणे यामध्ये बराच वेळ जातो. (Cooking Tips) त्यामुळे दुसऱ्या दिवशी बनवायची भाजी आदल्या दिवशी रात्रीच स्वच्छ करून फ्रिजमध्ये स्टोअर करा. असे केल्यास सकाळी तुमचा बराच वेळ वाचेल.

3. लसूण- हिरव्या मिरचीची पेस्ट टिकवण्याचा फंडा

बरेच लोक जेवणात लसूण आणि हिरव्या मिरचीचा वापर करतात. (Cooking Tips) त्यामुळे अशा लोकांसाठी लसूण आणि हिरव्या मिरचीची घरगुती पेस्ट फायदेशीर ठरते. ही पेस्ट तुम्हाला जास्त काळ टिकवून ठेवायची असेल तर यामध्ये १ चमचा गरम तेल आणि मीठ मिक्स करून ठेवा. म्हणजे आठवड्याभराची चिंता मिटली म्हणून समजा.

4. मसाले, ग्रेव्ही बनवून ठेवा

रोज सकाळी जेवण बनवताना मसाले किंवा ग्रेव्ही बनवण्यात बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आधीच मसाले किंवा ग्रेव्ही बनवून फ्रिजरमध्ये स्टोअर करा. असे मसाले आणि ग्रेव्ही जास्तीत जास्त २ ते ३ दिवस वापरता येतात.

5. फोडणीवेळी कांदा- टोमॅटोत मीठ घाला

गडबडीचा वेळेत कांदा टोमॅटो पटापट शिवायची एक सोप्पी ट्रिक आहे. (Cooking Tips) फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेताना त्यात चिमूटभर मीठ घाला यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यास मदत होईल.

6. बेसन वापरून ग्रेव्ही करा घट्ट

जर तुम्ही ग्रेव्हीची भाजी करत असाल आणि तुम्हाला ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर बराच वेळ आटवत बसायची गरज नाही. त्याऐवही भाजलेले बेसन वापरा किंवा पिठीसाखर घाला. यामुळे ग्रेव्हीची चवसुद्धा वाढेल आणि ग्रेव्ही लवकर घट्ट होईल.

7. टोमॅटो नसेल तर बाजारात जायची गरज नाही

बऱ्याचदा एखादी भाजी किंवा डाळ बनवताना आपल्या लक्षात येते की, घरातले टोमॅटो संपले आहेत. आता सकाळी घाईच्या एली टोमॅटो आणायला गेलात तर हमखास जादा वेळ जाईल. (Cooking Tips) त्यामुळे टोमॅटोची कमतरता भरून काढण्यासाठी टोमॅटो केचअप किंवा सॉसचा वापर करा.

8. डाळ बनवण्याआधी तासभर भिजत ठेवा

सकाळ सकाळ डाळ शिजवण्यासाठी तासभर असाच मोडतो. (Cooking Tips) हा वेळ कमी करायचा असेल तर डाळ शिजायला घालण्यापूर्वी स्वच्छ धुवून तासभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळ शिजायला फार वेळ लागत नाही. अगदी १० ते १५ मिनिटांत डाळ शिजेल.

9. कडधान्ये रात्रभर पाण्यात भिजवा

कडधान्ये शिजायला बराच वेळ घेतात. त्यामुळे सकाळी घाईच्या वेळी एकतर कडधान्याची भाजी बनवणे टाळा आणि बनवायची असेलच तर कडधान्ये रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे सकाळी कडधान्ये शिजायला फार वेळ घेणार नाहीत. खूपच घाई असेल तर कुकरच्या सहाय्याने कडधान्ये शिजवा. म्हणजे यामध्ये तुमचा फार वेळ जाणार नाही.

10. मीठ जास्त झाले तर..

बऱ्याचदा घाईघाईत आपल्याकडून पदार्थात जादा मीठ पडू शकते. जर असे झालेच तर घाबरून जाऊ नका. (Cooking Tips) त्यापेक्षा मीठ पडलेल्या पदार्थात थोडेसे दही, नारळाची पेस्ट, बटाट्याचे तुकडे किंवा ब्रेड घाला. हे पदार्थ तुमच्या पदार्थातील मीठ शोषून घेतात आणि त्यामुळे तुमच्या पदार्थातील खारटपणा दूर होतो.