Coolest Place In India : ‘हे’ आहे भारतातील सर्वात कुल ठिकाण; जिथे उन्हाळ्यातही लागते बेक्कार थंडी

Coolest Place In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Coolest Place In India) सध्या गरमीने इतकं हैराण व्हायला झालंय की, बस रे बस! कधी हा उन्हाळा संपतो असं वाटू लागलाय. नुसत्या घामाच्या धारा आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोसा केला आहे. अशा दिवसात घरातून बाहेर पडायला सुद्धा नको वाटत. पण ऑफिस आणि इतर आवश्यक कामांसाठी नाईलाजाने घराबाहेर पडावं लागत. मे – जूनच्या उन्हात तर आणखीच हैराण व्हायला होतं. अशात जर मस्त गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार असेल तर..? अहो ही नुसती कल्पना नाही तर वास्तव आहे. आपल्या देशात एक असं ठिकाण आहे जिथे कडक उन्हाळ्यातसुद्धा अंगावर शहारे आणणारी थंडी अनुभवता येते. चला तर एकही क्षण वाया न घालवता या ठिकाणाविषयी जाणून घेऊया.

देशातील सर्वात थंड ठिकाण (Coolest Place In India)

उन्हाळ्यात गरम होणार यात काही विशेष नाही. पण उन्हाळ्यात थंडी लागणे ही बाब नक्कीच विशेष आहे. उन्हाळ्यात आरामदायी वाटेल अशा ठिकाणी फिरायला जायची मजाच काही और आहे. त्यामुळे उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच हिल स्टेशनला पर्यटकांची गर्दी दिसते. कारण हिल स्टेशन्सला उन्हाळ्यातही कमी तापमान असते. ज्यामुळे उष्णतेचा दाह जाणवत नाही. मात्र आज आपण ज्या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत तिथे इतर वेळी सोडाच उन्हाळ्यातही थंडी लागते. हे ठिकाण म्हणजे हिमालय पर्वत रांगांच्या मधोमध वसलेले लेह लडाख.

वर्षभर थंडी असणारे लेह लडाख

आपल्या देशात वर्षभर थंडी असणारे एकमेव ठिकाण म्हणून लेह लडाख ओळखले जाते. हिमालय पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले लडाख अत्यंत आल्हाददायक अनुभव देते. इथे उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी असते. (Coolest Place In India) मग हिवाळ्यात काय होत असेल विचार करा. काही वृत्तानुसार, इथे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा २ ते १२ अंश सेल्सिअस असे तापमान असते. त्यामुळे इथे मे आणि जूनमध्ये सुद्धा हिमपर्वत पहायला मिळतात.

द्रास आणि सियाचीन ग्लेशियर

एकीकडे देशभरातील जवळपास सर्व राज्यांमध्ये तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअस इतके आहे. तर लेह लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील द्रास या शहराचे तापमान मात्र ७ अंश सेल्सिअस इतके आहे. (Coolest Place In India) हे भारतातील सर्वात थंड शहर मानले जाते. तसेच हिमालयाच्या पूर्व काराकोरम रेंजमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ असणारे सियाचीन ग्लेशियर हा बर्फाच्छादित भाग आहे. जो सर्वात थंड ठिकाणांपैकी एक असून इथे -५० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जाते.