CORONA : पुढील 20 दिवसांत कोरोनाची 4 थी लाट येणार? रुग्णांमध्ये होते वाढ, Expert काय म्हणतायत पहा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात जवळपास 6000 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातच भरीस भर म्हणून येत्या 20 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे यंदा कोरोनाची चौथी लाट तर येणार नाही ना अशी भीती नागरिकांना वाटत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही शक्यता नाही.

कोविड तज्ज्ञ डॉ. रघुविंदर पाराशर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल की, मागील कोरोना लाटेमधील विषाणूच्या पॅटर्नमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कारण तो फरकच आपल्याला व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून मदत करू शकतो. मागील ट्रेंडनुसार, येत्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. आणि त्यांनतर हळूहळू पुन्हा यामध्ये घेत होण्याची शक्यता आहे. सध्या तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही शक्यता दिसत नाही.

दरम्यान, शुक्रवारच्या कोरोना रिपोर्टनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश , हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काल एकाच दिवशी महाराष्ट्रात तब्बल 926 कोरोना रुग्ण आढळले, तर ३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 81,48,599 झाली आहे तर आत्तापर्यंत तब्बल 1,48,457 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी कोविड-19 च्या एकूण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाच्या नव्या सबव्हेरिएंट, XBB.1.16 मुळे रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचे म्हंटल आहे. तसेच कोरोना चाचणी आणि जीनोम सिक्वेन्सिंगसह नियमांचे पालन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.