नवी दिल्ली वृत्तसंस्था: डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. भारतात तर आता कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. अशातच केवळ माणसांवरती कोरोनाने हल्ला केला नाही तर आता कोरोनाने आपला मोर्चा प्राण्यांकडे देखील वळवला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी हैदराबाद या ठिकाणी असणाऱ्या प्राणिसंग्रहालयातील 8 सिंह कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. आता त्यानंतर इटावा येथील सफारी पार्क मधील दोन सिहिणींचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश मध्ये देखील कोरोनाचे संकट वाढत असताना इटावा मध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कातील दोन सिहिणी गौरी आणि जेनिफर कोरोना पॉझिटिव आढळून आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडालीय. गौरी आणि जेनिफरला सध्या आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि प्रशासनाच्या म्हणण्यानुसार यांची प्रकृती स्थिर आहे. इटावा सफारी पार्क चे संचालक केके सिंह यांनी याची पुष्टी केली ती लायन सफारीमधील गौरी आणि जेनिफर या दोघींना आरबीआरआय बरेली या ठिकाणाहून आलेल्या त्यांच्या तपासणी अहवालानुसार कोरोनाची लागण झाली आहे. इटावा सफारी मध्ये असणाऱ्या या दोघींची तब्येत गेले काही दिवस खराब होती.
Two lionesses have tested positive for COVID-19 at Etawah Safari Park. Both of them have been kept in isolation: Director, Etawah Safari Park
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 8, 2021
अखिल भारतीय पशु वैद्यकीय संशोधन संस्था बरेली येथे ही तपासणी केली आहे आणि तेथील संचालक ए के सिंह यांनी शुक्रवारी संध्याकाळी प्रेस नोट जारी करत याबाबत माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल पासूनच गौरी आणि जेनिफर ची तब्येत खराब होती. त्या दोघींना ताप आला होता त्यानंतर त्यांचे रक्त तपासणीसाठी बरेली या ठिकाणी पाठवण्यात आले होते. सहा मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले. त्यामुळे संपूर्ण पार्कमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दोघी सध्या पशुवैद्यकीय रुग्णालयात आयसोलेशन मध्ये असून तज्ञांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. हैदराबाद मधील आठ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर इटावा पार्क मध्ये देखील असलेल्या सिंहांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यानंतर आता येथील दोन सिहिणींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत .