#corona : भारताची परिस्थिती पाहून मन हेलावले,सर्वोतोपरी मदत करणार : Microsoft CEO सत्या नाडेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा स्थितीत अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. आधी लसीचा कच्चा माल पुरवण्यासाठी नकार देणाऱ्या अमेरिकेनेही आता भारताला मदत देण्याचे कबूल केले आहे. अशातच जगातील टॉपमोस्ट कंपनी पैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

मायाक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नाडेला यांनी ट्वीट करत भाताची परिथिती पाहुन दुःख झाल्याचे म्हंटले आहे. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये सांगितले आहे की, ” भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहून हृदयाला दुःख झाले. आपली कंपनी भारतीयांना पूर्णपणे मदत करण्यासाठी तयार आहे. आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार असल्याचे” त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे. दरम्यान, गुगल ने देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे केला असून 135 कोटींची मदत करण्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हंटले आहे.

अमेरिका करणार भारताला मदत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी कोरोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीय वैद्यकीय साहित्य सोबतच सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत जो बाईडन यांनी ट्विट केले असून ” ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचा ठरवल आहे असं म्हटलं आहे”. भारतीय एन एस ए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समीक्षक जेक सुलीवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटले आहे आणि भारताला सहकार्य करणाऱ्या वर चर्चा करण्यात आली.

 

Leave a Comment