चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णालयात पडताहेत मृतदेहांचे खच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या आजाराचे नुसते नाव जरी काढले तरी भीती वाटते. कारण कोरोनामुळे अनेकजणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. खरं पाहिले तर हा कोरोना परदेशातून म्हणजे चीनमधून आला होता. त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने आरोग्य उपचार करून नागरिकांना बरेही केले होते. मात्र, आता कालांतराने पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मृत्यूंची संख्यादेखील वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णालयामध्ये औषध आणि खांटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये 80 ते 90 टक्के वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. चीनमध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहे. चीनमधील कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा ढीग साचल्याचे रुग्णालयातील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

चीनमध्ये रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडून खाटांअभावी रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचीही कमतरता आहे. औषध आणि ऑक्सिजनचे संकटही गडद होऊ लागले आहे. दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत असून मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागाच नसल्यामुळे मृतदेह खोलीपासून रुग्णालयाबाहेर ठेवले जात आहेत. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

भारतात केंद्र सरकारकडून ‘कोविड अलर्ट’ जारी

या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारकडूनही काळजी घेण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांसमवेत देशातील कोव्हिड -19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एक बैठक घेणार आहेत. सध्या भारतात आठवड्याला सुमारे 1,200 रुग्णांची नोंद होत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, “जपान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, रिपब्लिक ऑफ कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, भारतीय सार्स-कोव्ह -2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (इन्साकोगॉगियम) च्या माध्यमातून व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक प्रकरणांच्या नमुन्यांचे संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार कराव्या. यामुळे देशात पसरणाऱ्या नवीन व्हेरिएंट्सचा वेळीच शोध घेता येईल आणि त्यासाठी आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना हाती घेणे सुलभ होईल.