Tuesday, January 31, 2023

सैन्यातील जवानाला कोरोनाने घेरले ; सुट्टी संपून नुकताच सेवेवर झाला होता रुजू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यात आता लष्करामधील एका जवानालाही करोना विषाणू संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सैन्यातील जवानांना या आजाराची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. लेहमध्ये हा जवान तैनात असून तो सुट्टी संपून नुकताच सेवेत रुजू झाला होता. सुट्टीवर असण्याच्या काळातच त्याला कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या जवानाचे वडील इराणहून धार्मिक यात्रेवरुन परतले आहेत.

दरम्यान या जवानाला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येताच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. इराणहून परतलेल्या या जवानाच्या वडिलांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

- Advertisement -

नवा संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाग्रस्तांचा देशातील आकडा १३८वर पोहोचला आहे. याचा संसर्ग वाढतच चालल्याने सरकारने कठोर निर्णय घेत देशाच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तपासणीशिवाय देशात प्रवेश करता येणार नाही.