“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”; डोनाल्ड ट्रम्प यांचा चक्रावून सोडणारा दावा

पेंसिलवेनिया । जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. अनेक देशातील जनजीवन कोलमडून पडलं आहे. स्वास्थ सेवांवर प्रचंड ताण आहे. या महामारीने अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही जगात सर्वाधिक आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी साधारण एक आठवडा अथवा १० दिवस लागतात. मात्र आपल्या हास्यास्पद दाव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच दरम्यान एक अजब दावा केला आहे. “माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी आपला मुलगा बॅरोन 15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला असा दावा केला आहे. पेंसिलवेनियाच्या मार्टिन्सबर्गमध्ये एका निवडणूक रॅलीत आपल्या समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी मुलाला झालेल्या कोरोनाबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मेलानिया ट्रम्प आणि त्यांचा मुलगा बॅरोन ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. व्हिस्कॉन्सिनमध्ये झालेल्या रॅलीतही ट्रम्प यांनी आपल्या मुलाच्या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा उल्लेख केला. त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे 15 मिनिटांत तो कोरोनामुक्त झाला. त्यानंतर त्याने आपल्यासमोर शाळेत जायची इच्छाही व्यक्त केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”
“बेरॉनच्या कोरोना टेस्टबाबत मी डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी मला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. 15 मिनिटांनी पुन्हा त्याच्या तब्येतीबाबत विचारलं तेव्हा डॉक्टरांनी तो कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांना अमेरिकेतील शाळा सुरू करायच्या आहेत. मात्र अनेक राज्य त्यांच्या या निर्णयाशी सहमत नाही. मुलांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प निवडणूक रॅलीतून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि निवडणूक रॅलीत आपल्या मुलाचं उदाहरण देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook