Corporate FD | कॉर्पोरेट FD म्हणजे काय?? सामान्य बँक एफडी पेक्षा त्यात काय वेगळपण आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Corporate FD | आज-काल अनेक लोक भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे अनेक पर्याय देखील आता उपलब्ध झालेले आहेत. तरी देखील अजूनही अनेक लोक फिक्स डिपॉझिट (FD)मध्ये गुंतवणूक करतात. कारण यामध्ये लोकांना खूप चांगला परतावा मिळतो. आणि त्यांचे पैसे देखील यामध्ये सुरक्षित राहतात. तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी असाल, तर तुम्हाला कॉर्पोरेट FD काय असते? हे माहीत असेल. परंतु अनेक लोक असे आहेत, ज्यांना या कॉर्पोरेट FD बद्दल माहीत नसते. या कॉर्पोरेट FD चा (Corporate FD) फायदा असा असतो की, या मध्ये तुम्हाला बँक FD च्या तुलनेत जास्त नफा देते. आता या कॉर्पोरेट FD चे फायदे तोटे नक्की काय आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

कॉर्पोरेट FD वर जास्त व्याज

FD ही बँकाद्वारे त्यांच्या ग्राहकांना दिली जाते. परंतु कॉर्पोरेट FD इतर कंपन्याद्वारे जारी केली जाते. या कॉर्पोरेट FD च्या माध्यमातून इतर कंपन्या असतात. ज्या लोकांकडून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी गोळा करतात. कॉर्पोरेट FD देखील बँकेच्या FD काम करते. यासाठी कंपनी ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदारांकडून पैसे घेते. आणि त्या ग्राहकांना व्याजासह ही रक्कम परत करते. जास्तीत जास्त ग्राहकांनी त्यांच्या FD मध्ये गुंतवणूक करावी. यासाठी कॉर्पोरेट FD चे व्याज हे सामान्य बँकेच्या FD च्या व्याजापेक्षा जास्त असते.

FD चा वेगवेगळा कालावधी | Corporate FD

या कॉर्पोरेट FD चा मॅच्युरिटी कालावधी हा एक वर्ष ते पाच वर्ष दरम्यान असतो. त्यामुळे या कालावधीनुसार त्यांचे व्याजदर देखील वेगळे असू शकते. ज्याप्रमाणे बँक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या अतिरिक्त व्याज देते. त्याचप्रमाणे सर्व कॉर्पोरेट FD मध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर देते.

कॉर्पोरेट FD चे तोटे

बँक FD ही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. त्यामध्ये रिजर्व बँकेचे देखील अनेक नियम असतात. परंतु कॉर्पोरेट FDच्या डीआयसीजी हे अंतर्गत विमा उपलब्ध आहे. परंतु कॉर्पोरेट FD वर असा कोणताही विमा नाही. कंपनी बुडाली तर तुमचे पैसे देखील बुडू शकतात. त्यामुळे कॉर्पोरेट FD मध्ये गुंतवणूक करताना विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.