हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. यासाठी आता कृषीमंत्र्यांनी देखील या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. मागील वर्षी खरी हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आताही पीक पेरा नोंद केलेले सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या अर्थसहाय्यासाठी पात्र असणार आहेत.
मागील वर्षी सदर वर्षीच्या सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक पिके वाया गेली की आणि तसेच अनेक अनेक पिकांवरती रोग देखील पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. खरीप हंगाम संपून आता वर्ष झालेले आहे, तरी देखील शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाला कोणत्याही प्रकारचा भाव मिळत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सगळ्या नुकसानाची भरपाई देण्यात येणार आहे. 0. 2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी ₹1000 देण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे त्याहून जास्त क्षेत्र असणारे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 5 हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 4194 कोटी रुपयांच्या खर्चच मान्यता देखील देण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पेऱ्याची नोंदणी केलेली आहे. ते सगळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या आर्थिक मदतीसाठी पात्र असणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली पाहिजे, अशी माहिती दिलेली आहे. तसेच शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमती पत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वाटप केला जाईल. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे