हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Country Of Midnight Sun) संपूर्ण जगभरात विविध रहस्य दडली आहेत. यातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे जेवढं विज्ञान आपल्याला चकित करतं त्याहून जास्त जगभरातील ही रहस्य आपल्याला थक्क करत असतात. मानवातील जिज्ञासा ही त्याला एखाद्या गोष्टीविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा देते. त्यामुळे अनेक लोकांना रहस्य, गुड, आश्चर्य अशा गोष्टींशी संबंधित ठिकाण, वास्तु किंवा वस्तूंविषयी जाणून घेण्यात रस असतो. आज आपण जगभरातील एका अशा ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत जेथे अनेक दिवस सूर्य मावळत नाही. अर्थात इथे रात्र होत नाही. चला तर हे ठिकाण कोणते आहे? याविषयी जाणून घेऊया.
मानवी जीवन असलेल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र या दोन मोठ्या महत्त्वाच्या खगोलीय घडामोडी आहेत. (Country Of Midnight Sun) २४ तासांचा एक दिवस असतो. त्यात १२ तास प्रकाश तर १२ तास अंधार असतो. ही झाली सर्वसामान्य माहिती. मात्र जगभरात एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी सलग ७६ दिवस फक्त आणि फक्त सकाळ असते. चमत्कारिक आहे मात्र हे सत्य आहे.
कुठे आहे हे ठिकाण?
जगभरात एक असा देश आहे ज्याच्या उत्तर गोलार्धाच्या भागात तब्बल ७६ दिवस सकाळ असते. अर्थात सूर्यप्रकाश असतो. हा देश म्हणजे नॉर्वे. या देशात अनेक पर्यटक येत असतात. (Country Of Midnight Sun) नॉर्वे हा पर्यटकांचा अत्यंत लोकप्रिय देश आहे. त्यामुळे नॉर्वे मध्ये कायम पर्यटकांची गर्दी दिसून येते. या देशाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथील आगळीवेगळी खगोलीय घटना. ज्याविषयी आपण आज माहिती घेत आहोत.
कंट्री ऑफ मिडनाइट सन (Country Of Midnight Sun)
नॉर्वे या देशातील आगळ्यावेगळ्या खगोलीय घटनेबद्दल संपूर्ण जगभरात चर्चा आहे. इथे रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी सूर्य मावळतो आणि बरोबर ४० मिनिटांनी पुन्हा उगवतो. बरोबर १.३० वाजले की इथे सकाळ होते आणि अचानक पक्षांची किलबिल सुरु होते. अर्थात नॉर्वेमध्ये मध्यरात्रीच सूर्य उगवतो आणि म्हणून नॉर्वे या देशाला ‘कंट्री ऑफ मिड नाईट सन’ असे म्हटले जाते.
अनोखा नजारा
नॉर्वे हा देश आर्टिक सर्कल अर्थात उत्तर गोलार्धात येतो. ज्या ठिकाणी १० एप्रिल ते २३ ऑगस्ट या कालावधीत सूर्य जसाच्या तसा असतो अर्थात सूर्य मावळत नाही. (Country Of Midnight Sun) ही अद्भुत घटना नॉर्व्हेचा हॅमरफेस्ट शहरात पहायला मिळते. ही घटना एखादा अद्भुत नजारा असल्याचे म्हटले जाते. नॉर्वे मधील सौंदर्य फारच लक्षवेधी आहे. त्यामुळे पर्यटक नॉर्वेच्या सौंदर्यसह हा अनोखा नजारा पाहायला आवर्जून येतात. डोंगरदर्यांनी वेढलेला हा देश एका नैसर्गिक रहस्याने आणखीच खास ठरतो आहे.
मानवी जीवनमान
मानवाचे जीवन हे नैसर्गिक चक्रावर अवलंबून असते. नॉर्वे या देशातील ही अद्भुत नैसर्गिक घटना मानवी जीवनावर विशेष परिणाम करत असेल असे वाटू शकते. मात्र येथे राहणारी लोक अगदी आपल्यासारखेच जीवन जगतात. केवळ येथील कॉस्ट ऑफ लिविंग जास्त आहे. येथील स्थायिक लोकं आपल्यासारखं २४ तासांचं घड्याळ वापरतात. त्यामुळे त्यांचे जीवनमान सर्वसाधारण आहे. (Country Of Midnight Sun)