शिखर धवन आणि पत्नी आईशाच्या घटस्फोटाला न्यायालयाची मंजुरी; चाहत्यांना मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताचा प्रसिद्ध फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आईशा मुखर्जी या दोघांच्या घटस्फोटाला दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. शिखर धवनला त्याच्या पत्नीने म्हणजेच आईशाने मानसिक त्रास दिला अशी टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली आहे. गेल्या अनेक काळापासून या दोघांच्या वैवाहिक नात्यांमध्ये कुरबुर सुरू होतील. त्यावरून या दोघांनी कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अखेर आज न्यायालयाने या दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. यामुळे आता आईशा आणि धवनचा वेगळे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिखर धवन आणि आयशा या दोघांच्या नात्याविषयी अनेक बातम्या समोर येत होत्या. तसेच या दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत चाललेले नाही असे देखील म्हणले जात होते. या सर्व चर्चा तितक्याच तथ्ये होत्या. काही काळापूर्वीच या जोडप्याने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, आज न्यायालयाने या दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. शिखर धवनने आपल्या आहारामध्ये म्हटले होते की, आयेशा कडून माझा मानसिक छळ होत आहे. त्यामुळे समुपदेशानंतरही आमच्या सिमेंट घडून येत नाहीये त्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. या कारणावरूनच या जोडप्याच्या घटस्फोटाला मंजुरी मिळाली आहे.

दरम्यान गेल्या नऊ वर्षापासून वैवाहिक जीवनात अडकलेले आईशा आणि शिखर धवन आज वेगळे झाले आहेत. त्यांना एक नऊ वर्षांचा मुलगा देखील आहे. या मुलाची कस्टडी शिखर धवनने मागितली आहे. या कस्टडीमध्ये त्याने आजवर आयुष्याकडून जो छळ करण्यात आला त्याविषयी उल्लेख केला आहे. त्यामुळे न्यायालयाकडून ही कस्टडी शिखरकडे जाण्याची दाट शक्यता आहे. शिखर धवनचा संपूर्ण देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या सर्व घटनेचा धक्का शिखरच्या चहात्यांना देखील बसला आहे.