Covaxin Side Effect | गेल्या काही दिवसांपासून एक्स्ट्राझेनका या कंपनीची कोविशील्ड लस चांगलीच वादात सापडली आहे. या लसीमुळे काही दुष्परिणाम होत असल्याचे एका अभ्यासात आढळून आलेले आहे. परंतु आता नुकताच झालेल्या एका अभ्यासामध्ये कोवॅक्सिन या लसीचा देखील दुष्परिणाम होत असल्याचे अजून आलेले आहे. संशोधकांनी याची माहिती शोधून काढलेली आहे. ज्या किशोरवयीन मुलांना ऍलर्जीचा आधीपासूनच त्रास आहे. त्यांना कोवॅक्सिन (Covaxin Side Effect) लस घेतल्यानंतर AESI होण्याचा धोका आहे. या प्रकरणाचा अहवाल देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. भारतीय बायोटेकच्या लसीच्या दुष्परिणाम परिणामांवरील अभ्यासात AESI यांसारख्या घटनांची नोंद करण्यात आलेली आहे.
काही दिवसांपूर्वीच फार्मा कंपनी एस्ट्राझेनिका यांनी न्यायालयात कबूल केले होते की, त्यांच्या लसीमुळे काही प्रकारणांमुळे दुष्परिणाम आढळतात. कंपनीने स्वतः कबूल केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या अभ्यासात 1024 लोकांचा समावेश होता. यामध्ये केवळ 635 किशोरवयीन आणि 291 प्रौढ व्यक्तींना एका वर्षाच्या फॉलो अपमध्ये संपर्क साधता आला. यामध्ये 303 किशोरवयीन आणि 124 प्रौढांमध्ये अप्पर रेसपेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची नोंद करण्यात आली.
संशोधकांना रुग्णांमध्ये या गोष्टी आढळल्या | Covaxin Side Effect
- सामान्य विकार – 10.2%
- त्वचा आणि त्वचेखालील विकार – 10.5%
- मस्कुलोस्केलेटल विकार – 5.8%
- मज्जासंस्थेचे विकार – 5.5%
- महिलांमध्ये, 4.6% ने मासिक पाळीतील असामान्यता
या काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोम आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे ज्या लोकांना एलेर्जीचा त्रास आहे. अशा स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींमध्ये टायफॉइडची समस्या जास्त असते.