COVID-9 Cases In India: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; लॉकडाऊन कधी लावतात? जाणून घ्या महत्त्वाचे नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

COVID-9 Cases In India: देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून हजारांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. नवीन सब-वेरिएंटमुळे चिंतेचं वातावरण असलं, तरी लॉकडाऊनसारखी परिस्थिती अद्याप नाही. सरकारने दक्षता घेतली असून नागरिकांनीही (COVID-9 Cases In India) खबरदारी घेणं गरजेचं आहे.

भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नवीन सब-वेरिएंट JN.1 आणि LF.7 यामधून आता रुग्ण आढळून येत असून देशभरात विविध राज्यांमध्ये दररोज नव्या केस समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाचे हे नवीन प्रकार ओमिक्रॉनशी संबंधित आहेत आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हे वेरिएंट फारसे घातक नाहीत. तरीही खबरदारी म्हणून मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना पूर्वी गंभीर त्रास झाला (COVID-9 Cases In India) आहे किंवा ज्यांचे इम्युन सिस्टीम कमकुवत आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

लॉकडाऊन कधी लावतात?

सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू असली, तरी सरकार लगेच लॉकडाऊन लावत नाही. लॉकडाऊनचा निर्णय तेव्हाच घेतला जातो, जेव्हा मृत्यू दर झपाट्याने वाढतो आणि संसर्गाचा धोका नियंत्रणाबाहेर जातो. त्याआधी टप्प्याटप्प्याने काही निर्बंध लावले जातात – जसं की सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा, मास्क बंधनकारक करणे, गर्दीवर नियंत्रण इ.

सध्या घाबरण्याचं कारण नाही

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर देशातील बहुतांश लोकांनी लसीकरण पूर्ण केलं आहे आणि बूस्टर डोसही घेतला आहे. त्यामुळे आताचे वेरिएंट तुलनेत कमी घातक आहेत. सरकारही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनची शक्यता कमी आहे. नागरिकांनी स्वतःहून कोरोना प्रोटोकॉल पाळणं महत्त्वाचं आहे. मास्क वापरणं, हात स्वच्छ ठेवणं आणि गर्दीपासून शक्यतो दूर राहणं. ही साधी खबरदारी घेतल्यास आपण सुरक्षित राहू शकतो.