हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Covishield) कोरोना महामारीने लोकांच्या मनात निर्माण केलेली भीती अजूनही कायम आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. कोरोनाने आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे? ते शिकवले. यामुळे जसा कोरोनाचा प्रभाव कमी झाला लोक आपोआपच आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. दरम्यान कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाने या लढाईत मोठी साथ दिली. असे असताना कोरोना लास Covishield बाबत देशभरात अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. अखेर याबाबत ICMR च्या शास्त्रज्ञांनी दिलासादायक माहिती प्रदान केली आहे.
काय म्हणाले तज्ञ?
पुढे म्हटलंय की, ‘मात्र हे फार दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते. त्यामुळे या लसीपासून धोका आहे, हा निव्वळ गैरसमज आहे. तुम्ही पहिला डोस घेता तेव्हा सर्वाधिक धोका जाणवतो. (Covishield) मात्र, दुसरा डोस घेतल्यानंतर हा धोका कमी होतो. तसेच तिसऱ्या डोसनंतर हा धोका मिटतो. लसीमुळे होणारे साइड इफेक्ट्स हे पहिल्या दोन ते तीन महिन्यांत दिसून येतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर अनेक वर्षे झाली असली तर घाबरण्याची गरज नाही’.
कोविशील्डबाबत कशी पसरली भीती? (Covishield)
वास्तविकपणे, या संपूर्ण प्रकारची सुरुवात ही ब्रिटीश न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यापासून झाली आहे. यात काही मृतांच्या नातेवाईकांनी असा दावा केला होता की, कोविशील्ड लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रियजनांचा मृत्यू झाला. त्यावेळी लस तयार करणारी कंपनी AstraZeneca ने न्यायालयात कबूल केले होते की, क्वचित प्रसंगी रक्त गोठण्याची समस्या असू शकते.
(Covishield) तर भारतात, ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली. ज्याला ‘कोविशील्ड’ नाव दिले. देशात सुमारे ९०% लोकांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनमधील प्रकरण बातम्यांमध्ये पसरल्यानंतर देशभरात काही लोकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे दिसून आले.