Covishield Vaccine | कोरोना काळामध्ये आपण या रोगापासून वाचण्यासाठी अनेक लसी घेतल्या होत्या. त्यातील कोव्हीशिल्ड लसीबाबत गेल्या दिवसांपासून अनेक चर्चा चालू आहे. काही लोकांना या लसीचे दुष्परिणाम देखील जाणवत आहे. त्यामुळे आता ज्या लोकांनी कोव्हीशिल्ड घेतलेली आहे. त्या सगळ्यांना आपल्याला काही होणार तर नाही ना? अशी काळजी लागली आहे. अशातच आता कोव्हीशिल्डची (Covishield Vaccine) निर्मिती करणाऱ्या कंपनीने एक मोठी घोषणा केलेली आहे.
एक्स्ट्राझेन्का कंपनीने जगभरात कोव्हीशिल्डचा साठा परत मागून घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. मंगळवारी या कंपनीने याबाबतची मोठी घोषणा केलेली आहे. आणि जगभरातून कोव्हीशिल्ड मागे घेण्याच्या प्रक्रियेला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि या चर्चेमुळे कंपनीने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जागतिक स्तरावरील कोव्हीशिल्डची मागणी देखील कमी आहे. त्यामुळे आता या लसीचा पुरवठा ही कंपनी करणार नाही.
कोविड काळामध्ये कोव्हीशिल्ड (Covishield Vaccine) ही लस संपूर्ण जगात उपलब्ध होती. परंतु सध्या कोविड-19 साठी अनेक प्रगतशील लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोव्हीशिल्डची मागणी देखील कमी झालेली आहे. त्यामुळे एक्स्ट्राझेन्का या कंपनीने कोव्हीशिल्डची निर्मिती देखील थांबवलेली आहे आणि वितरण प्रक्रिया देखील बंद केलेली आहे.
कोव्हीशिल्ड कोणते दुष्परिणाम होतात | Covishield Vaccine
गेले काही दिवसांपासून कोव्हीशिल्ड ही लस घेतलेली आहे. त्यांनी अनेक दुष्परिणाम झाल्याचे सांगितलेले आहे. ब्रिटनमध्ये यावरून न्यायालयात देखील वाद सुरू झालेला आहे. या प्रकरणात न्यायालयात विशेष दुष्परिणाम झालेल्या रुग्णांची यादी देखील सादर केलेली आहे. यातील अनेक रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झालेल्या आहे. एक्स्ट्राझेन्का या कंपनीने देखील कोव्हीशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनियासिंड्रोम म्हणजेच थ्रोम्बोसीस होऊ शकतो आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. याची कबुली दिलेली आहे. अजूनही अनेक लोकांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात, असे या कंपनीचे म्हणणे आहे. परंतु यापासून भारतीयांना कमी धोका असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.