Covishield Vaccine| चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगाने कोरोनाच्या महामारीचा सामना केलेला आहे. हा एक संसर्गजन्य आजार होता. त्यामध्ये अनेक लोकांचा बळी देखील केलेला आहे. परंतु कोरोनापासून बचाव होण्यासाठी अनेक लोकांना ही लस देण्यात आली होती. यावेळी लोकांना ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका ही लस देण्यात आली होती. आदार पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून ही लस देण्यात आली होती. देशातील अनेक लोकांनी ही लस घेतली होती. परंतु आता कोरोनानंतर चार वर्षांनी या कंपनीने सांगितले आहे की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येत आहेत.
कोव्हीशिल्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका | Covishield Vaccine
एका कायदेशीर प्रकरणात एस्ट्राझेनेका यांनी सांगितलेले आहे की, कोव्हीशिल्ड आणि वॅक्स जेव्हरिया या ब्रँड नावाने भारतात विकल्या जाणाऱ्या कोव्हीशिल्ड लसीमुळे ब्लड क्लॉट्स धोका मोठा आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्टोक आणि प्लेटलेट्स कमी होण्याचा देखील धोका होऊ शकतो. परंतु हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल. सामान्य लोकांना यासाठी घाबरण्याची गरज नाही. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ब्रिटनमधील स्कॉट नावाच्या व्यक्तीने या कंपनी विरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचण्याचे परिणाम दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे अनेक कुटुंबीयांना देखील याबाबत दुष्परिणाम झेलावे लागेल आहे.
एस्ट्राझेनेका यांनी काय कबुली दिली | Covishield Vaccine
उच्च न्यायालयात उत्तर देताना या कंपनीने मान्य केले आहे की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये या लसीमुळे त्रास होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. ही लस मोठ्या प्रमाणात दिली आहे. तरी देखील या कंपनीने लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार खूप मोठ्या प्रमाणात लसीकरण केले आहे. त्यामुळे काही लोकांमध्ये ही समस्या दिसू शकते. ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव युकेमध्ये दिली जात नाही. कारण हे प्रकरण न्यायालयात आता प्रलंबित केलेले आहे. परंतु जर न्यायालयाने दावा मान्य केला, तर कंपनीला मोठी रक्कम भरावी लागेल.