Crack Heal : पायांना भेगा पडण्याची समस्या ही अगदी सामान्य समस्या आहे. अनेकजण या समस्येचा सामना करीत असतात. पायांना भेगा पडल्या की पाय खराब दिसू लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या भेगा कालांतराने वाढत गेल्या तर भेगा खूपच दुखायला (Crack Heal) लागतात. मग अशावेळेला पायांच्या भेगा ही मोठी समस्या बनते.
कधीकधी पायांच्या भेगांमधून रक्तही यायला लागते. पायांच्या भेगांसाठी अनेकजण घरगुती उपाय करीत असतात. मात्र मुळात पायांना भेगा (Crack Heal) का पडतात ? हे आपण समजून घेतले पाहिजे.
पायाला भेगा पडण्याची प्रमुख कारणे
- ऋतू मध्ये होणाऱ्या बदलामुळे पायाला भेगा पडण्याची शक्यता असते.
- जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटामिन ची कमतरता असते तेव्हा शरीर आपल्याला संकेत देत असतं यातीलच एक प्रकार म्हणजे भेगा पडणे
- शरीरातील हार्मोन्स मुळे सुद्धा पायांना भेगा (Crack Heal) पडण्याचे प्रमाण वाढते.
- हार्मोन्स आणि विटामिन्स मुळे त्वचेची आर्द्रता कमी होते त्यामुळे त्वचा रुक्ष होऊन पायाच्या टाचांना भेगा पडतात.
- विटामिन बी थ्री इ च्या कमतरतेमुळे केवळ पाच नव्हे तर शरीरातील एकूणच त्वचा वृक्ष होते त्यामुळे त्वचा फाटण्याचाही धोका असतो
- जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ती कमी लवचिक आणि कडक होते आणि त्यामुळे पायाच्या टाचांना भेगा पडतात.
काय आहे उपाय ? (Crack Heal)
प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार पायाच्या टाचांना भेगा पडण्यावर उपाय पुढीलप्रमाणे आहे.
स्निग्धता असलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त सेवन करा म्हणजे वात प्रकोप आणि त्यामुळे होणारा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते याचा अर्थ कोरड्या गोष्टी कमी खाव्यात. तेल आणि तुपाचा (Crack Heal) आहारातील वापर वाढवावा.
झोपण्यापूर्वी न चुकता दुधात एक चमचा गाईचं तूप घालून प्यावं त्यामुळे थंडी संपून उन्हाळा सुरू होताना ऋतू बदलाच्या काळात शरीराला स्निग्धता मिळण्यास मदत होते. आणि आत्ता फेब्रुवारी महिन्यात असंच काहीसं वातावरण असतं त्यामुळे हा नक्की प्रयोग तुम्ही करून बघू शकता.
तिसरा आणि आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे बेंबीमध्ये न चुकता दोन थेंब एरंडेल तेल (Crack Heal) घाला यामुळे शरीराचा कोरडेपणा दूर व्हायला मदत होते.