श्रद्धा वालकर हत्याकांड पुनरावृत्ती : प्रेमाचे आश्वासन देत प्रेयसीला घातल्या गोळ्या, 200 किमी दूर जंगलात फेकला मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र, आंधळ्या प्रेमातील जोडीदाराने जर धोका दिल्यास काय परिणाम होतात हे श्रद्धा वालकर हत्याकांडातून सर्वांनी पाहिलं असेल. अशाच हत्याकांडाची पुरावृत्ती छत्तीसगड येथे घडली आहे. छत्तीसगढमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची रायपूरपासून 200 किलोमीटर दूर नेत ओरिसामध्ये तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.

ज्या प्रेयसीची हत्या केली ती तनु कुर्रे ही कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती रायपूरमधील एका खासगी बँकेत नोकरीला होती. दरम्यान, तिची बालनगीर येथील व्यावसायिक सचिन अग्रवाल याच्याशी ओळख झाली. दोघांमधील ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. पण ज्याच्यावर प्रेम करतेय तोच आपली हत्या करेल, हे तनूला माहित नव्हते.

21 नोव्हेंबर रोजी तनूचा फोन बंद असल्याने कुटुंबीय तिच्याशी बोलू शकले नाहीत. घाबरलेल्या नातेवाईकांनी रायपूर गाठलं आणि येथील पंडरी पोलीस ठाण्यात तनू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

जीवंत असल्याचा केला बनाव

तनूची पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतरही सचिन तनूच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. तनू आणि त्याचे लवकरच लग्न होईल, असे आश्वासन तो घरच्यांना देत राहिला. त्याचा स्क्रिनशॉटही त्यानं कुटुंबीयांना दाखवला, जेणेकरून कुटुंबीयांना तनू जिवंत आहे, असे वाटेल. सचिनने तनूला गोळ्या घालून ठार केले आणि तनूचा मृतदेह बालंगीरच्या जंगलात पेट्रोल टाकून फेकून दिला. त्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटू शकली नाही. येथे ओदिशा पोलिसांना तनुचा मृतदेह मिळाला. ओरिसा पोलिसांनी रायपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली.

रायपूर पोलिसांनी केला खुलासा

तनूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपास केला केल्यानंतर एक खुलासा केला. संबंधित तरुण आणि तरुणी एकमेकांना आधीच ओळखत होते. काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी पंडरी पोलीस ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. चौकशीत तरुण आणि तरुणी एकत्र ओदिशात गेल्याचे उघडकीस आले. ओडीशात तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने तरुणाने तिची हत्या केली. ओडीशातील बालंगीर येथे मुलीचा मृतदेह सापडला असून आरोपीला ओदिशा पोलिसांनी अटक केली आहे.