Credit Card Application | आजकाल क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. क्रेडिट कार्डचा वापर एका ट्रेंड प्रमाणे केला जात आहे. तुमच्याकडे पैसे नसले, तरी देखील तुम्ही क्रेडिट कार्डमुळे अनेक ठिकाणी पैसे खर्च करू शकता. यामुळेच आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु जर तुम्हाला देखील क्रेडिट कार्ड वापरायचे असेल तर त्यासाठी तुमचा बँकेत सीबील स्कोर चांगला असणे खूप गरजेचे असते. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल, तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देत नाही.
सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजे काय?| Credit Card Application
क्रेडिट कार्ड मध्ये सुरक्षित क्रेडिट कार्डचा एक नवीन प्रकार आलेला आहे. यासाठी तुमचे सुरक्षित मुदत ठेवी असायला लागतात. म्हणजेच तुम्हाला जर सुरक्षित क्रेडिट कार्ड बँकेकडून घ्यायचे असेल, तर त्या बँकेमध्ये तुमची एफडी असणे गरजेचे आहे. यामध्ये एफडीची मर्यादा जवळपास 85% पर्यंत ठेवली जाते.
या सुरक्षित क्रेडिट कार्डमध्ये एफडी बँकेमध्ये असते. आणि ग्राहक त्या क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात. तुम्ही जेव्हा हे क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा ते क्रेडिट कार्डचे बिल देखील तुम्हाला वेळेवर भरावे लागतात. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर बँका तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस लावतात. तुमचा सिबील स्कोर चांगला नसल्याने बँकेने तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले नाही, तर तुम्ही बँकेमध्ये एफडी करून सुरक्षित क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे कोणते?
- तुम्हाला जर तुमचा क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुमचा बँकेचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे तसेच इतर ईएमआय देखील वेळेवर भरावे लागते.
- तुमच्या या सुरक्षित क्रेडिट कार्डची मर्यादा एफडीवर अवलंबून असते. म्हणजे तुमच्या एफडीची रक्कम जेवढी जास्त असते, तेवढी जास्त रक्कम तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे वापरायला मिळते.
- सुरक्षित क्रेडिट कार्ड घेताना तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा पुरावा द्यावा लागत नाही.
- सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या खर्चाव्यतिरिक्त मर्यादा असते.