Credit Card Application : क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याआधी समजून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी; नाहीतर बेक्कार फसाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card Application) आजकाल बरेच लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तर एक प्रकारचे कर्ज. जे रोख स्वरूपात न मिळता कार्डच्या स्वरूपात मिळते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा अगदी पैशासारखा केला जातो. त्यानंतर महिना अखेरीस खर्च केलेली रक्कम व्याजासहित पार्ट केली जाते. असे हे क्रेडिट कार्ड वापरण्याचे बरेच फायदे आहेत. पण जिथे फायदा तिथे तोटासुद्धा असण्याची शक्यता असते. ज्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आता क्रेडिट कार्ड वापरणे काही कठीण गोष्ट नाही. पण हे विसरून चालत नाही की, क्रेडिट कार्ड हे एकप्रकारे जबाबदारी आहे. जी पार पाडणे आवश्यक असते.

आजच्या घडीला वेगवेगळ्या ऑफर्ससह अनेक क्रेडिट कार्ड बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना नक्कीच चांगल्या आणि अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत. (Credit Card Application) त्यामुळे जर तुम्हीही क्रेडिट कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात काही चूक नाही. मात्र, क्रेडिट कार्ड घेताना तुम्हाला कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड घ्यावे याबाबत संभ्रम होऊ शकतो. शिवाय क्रेडिट कार्डची खरेदी करतेवेळी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजचे असते. त्या कोणत्या याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मासिक खर्चानुसार निवड

क्रेडिट कार्ड खरेदी करताना प्रत्येकाने त्यांच्या मासिक खर्चानुसार कार्ड निवडणे गरजचे असते. (Credit Card Application) तसेच तुम्ही कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड घ्यायला हवे? याचे तुमच्याकडे ठोस कारणसुद्धा असायला हवे. जे तुमच्या गरजेला साजेसे असेल. कारण क्रेडिट कार्ड एक प्रकारचे लोन आहे. जे घेतल्यानंतर फेडणे तुमची जबाबदारी आहे.

आवश्यकता आहे का? (Credit Card Application)

माझ्या मित्राने क्रेडिट कार्ड घेतलं म्हणून मी घेतो हे कोणत्याही प्रकारे सुयोग्य कारण असू शकत नाही. त्यामूळे सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की, तुम्हाला क्रेडिट कार्डची खरोखर आवश्यकता आहे का? तुमची गरज काय आहे? यावर क्रेडिट कार्ड घ्यायचे का नाही हे ठरते. यात मोठी खरेदी करण्यासाठी चांगली क्रेडिट मर्यादा मिळणे, ऑफरचा फायदा घेणे किंवा सुरवातीपासून क्रेडिट वाढवणे अशा कारणांचा समावेश असेल तर क्रेडिट कार्ड नक्की घ्या.

क्रेडिट प्रोफाइल तपासा

जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्ही तुमची क्रेडिट प्रोफाइल तपासा. यावरून तुम्हाला क्रेडिट कार्ड खरेदीसाठी तुमची पात्रता लक्षात येईल. (Credit Card Application) तुमची पात्रता आणि गरज यानुसार क्रेडिट कार्डची तुलना केल्यास तुमचा गोंधळ कमी होईल आणि तुम्ही निश्चित निर्णय घेऊ शकाल.

सुविधांबाबत माहिती घ्या

आजकाल क्रेडिट कार्डसोबत अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना तुमच्या गरजेनुसार सर्वात जवळचे कार्ड निवडा. ज्यामध्ये ऑफर्स आणि इतर चांगल्या सुविधा उपलब्ध असतील. (Credit Card Application) असे केल्यास तुम्ही घेत असलेले क्रेडिट कार्ड तुम्हाला किती फायदा देऊ शकते? याचा अंदाज येईल.

आधी निवड करा मगच अर्ज करा

क्रेडिट कार्ड खरेदीसाठी अर्ज करताना गडबड गोंधळ करू नका. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे हे निश्चित झाल्यास आधी बँकेला भेट द्या. त्याविषयी सर्व माहिती घ्या आणि नंतर बँकेच्या वेबसाइटद्वारे किंवा कोणत्याही तृतीय- पक्षाच्या वेबसाइटद्वारे अर्ज करा. (Credit Card Application) एकंदरच काय की, चांगले क्रेडिट कार्ड निवडा आणि त्यानंतरच अर्ज करा.