Credit Card | युनियन बँक ऑफ इंडियाने लॉन्च केले खास क्रेडिट कार्ड, केवळ याच महिलांना मिळणार लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Credit Card | आजकाल क्रेडिट कार्ड अनेक लोक वापरतात. क्रेडिट कार्ड वापरणे हा एक प्रकारे ट्रेंड झालेला आहे. अगदी कॉलेजला असणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. या क्रेडिट कार्डचा वापर अगदी गाड्यांना इंधन भरण्यापासून ते अनेक प्रकारची खरेदी करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे या क्रेडिट कार्डमुळे ग्राहकांना देखील वेगवेगळे फायदे मिळत असतात. अनेक बँकांकडून हे क्रेडिट कार्ड लॉन्च केले जातात. खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यानुसार आणि ऑफर्सनुसार क्रेडिट कार्ड (Credit Card) लॉन्च केलेले आहे.

अशातच आता सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध असलेली युनियन बँक ऑफ इंडिया यांनी देखील दिवा या नावाने त्यांचे स्पेशल क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे हे कार्ड फक्त महिलांनाच वापरता येणार आहे. त्यामुळे युनियन बँकांच्या महिला ग्राहकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण याआधी या बँकेने त्यांचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले नव्हते. हे क्रेडिट कार्ड आता फक्त महिलांना वापरता येणार आहे.

युनियन बँकेच्या कोणत्या महिलांना लाभ मिळणार? | Credit Card

युनियन बँकेने लॉन्च केलेले हे दिवा क्रेडिट कार्ड फक्त महिलांसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे. या क्रेडिट कार्डसाठी18 ते 70 या गटातील महिला अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे जर एखादी महिला पगारदार असेल तर ती महिला वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकते. हे क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी उत्पन्नाची अट अशी आहे की, महिला ग्राहकाचे दर वर्षाचे उत्पन्न हे कमीत कमी अडीच लाख रुपये असणे गरजेचे आहे.

या क्रेडिट कार्डमुळे महिलांना कोणते फायदे मिळणार?

युनियन बँक ऑफ इंडिया लेखाच महिलांसाठी लॉन्च केलेल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अर्बन क्लब, बुक माय शो, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, मंत्रा या तर इतर महत्त्वाच्या ब्रँडचे डिस्काउंट देणार आहे. त्याचप्रमाणे या क्रेडिट कार्डवर एका वर्षात आठ कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज आणि दोन कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल एअरपोर्ट लाऊंजची सुविधा देखील मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वार्षिक आरोग्य तपासणी सुविधा देखील या क्रेडिट कार्ड द्वारे महिलांना मिळणार आहे.

जर महिलांनी या क्रेडिट कार्डचा वापर करून इंधन भरले तर तुम्हाला 1 टक्के इंधन अधिभाराची सूट देणार आहे. दिवा क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांमध्ये तुम्हाला दोन रेकॉर्ड पॉईंट मिळतील.

वार्षिक किती फी भरावी लागेल?

युनियन बँक दिवा क्रेडिट कार्डसाठी सहभागी होण्यासाठी तुमचे सोन्याचे शुल्क शून्य रुपये आहे. परंतु तरी देखील 499 वार्षिक शुल्क तुम्हाला भरणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एका आर्थिक वर्षांमध्ये तीस हजारापेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला 100 टक्के सूट मिळणार आहे.