Credit Card Inssuance Rule | क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्यांना RBI ने दिल्या नव्या सूचना, केला ‘हा’ मोठा बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Credit Card Inssuance Rule | ज्या बँका क्रेडिट कार्ड जारी करतात. त्या बँकांसाठी एक अतिशय मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रीय बँक म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. रिझर्व बँकेने या संदर्भात एक अधिकृत सूचना देखील जारी केलेली आहे. आणि याच अधिसूचनेनुसार बँकेने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे आणि एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता ज्या क्रेडिट कार्ड कंपन्या (Credit Card Inssuance Rule) आहेत त्यांना ग्राहकांसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकांच्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्क करण्याचा पर्याय देण्याचे आदेश दिलेले आहेत. ग्राहकांना क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्क वरून निवडण्याचा पर्याय देखील आता द्यावा लागणार आहे.

आरबीआयने (Credit Card Inssuance Rule) आता असे आदेश दिले आहेत की, त्यांनी कार्ड नेटवर्कची असा कोणताही करार करू नये ज्यामुळे इतरांच्या सेवांचा त्यांना लाभ घेता येणार नाही. यासाठीच आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने अधिकृत कार्ड नेटवर्कची नावे स्वतः जाहीर केलेली आहे.

या नवीन सूचनांचा उद्देश नक्की काय? | Credit Card Inssuance Rule

नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यामागील आरबीआयचा उद्देश म्हणजे जास्त क्रेडिट कार्ड जारी करणे आणि ग्राहकांना त्यांच्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देणे. पात्र ग्राहकांना कार्ड जारी केल्यावर एकापेक्षा जास्त काळ निवडण्याचा पर्याय ऑफर करणे खूप आवश्यक आहे.

विद्यमान काळधारकांच्या बाबतीत हा पर्याय त्यांच्या पुढील कराराच्या वेळी त्यांना दिला जाणार आहे. या सूचना केवळ 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय कार्ड असलेल्या क्रेडिट कार्ड (Credit Card Inssuance Rule)कंपन्यांना लागू होणार नाही. बाकी सगळ्या कंपन्यांना हा नवीन नियम लागू होणार आहे.