Crew Movie Box Office Collection | पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’ची गाडी सुटली सुसाट, केला ‘इतक्या’ कोटींचा व्यवसाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crew Movie Box Office Collection | मागील अनेक दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्या ‘क्रू’ (Crew Movie Box Office Collectionया चित्रपटाची चर्चा होती. अशातच हा चित्रपट 29 मार्च रोजी थेटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटात एका एयरलाईन्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या तीन महिलांची कहाणी दाखवलेली आहे. या तीन महिला खूप मोठी स्वप्न घेऊन त्यांचे करिअर बनवण्यासाठी निघतात. ही कथा या चित्रपटात दाखवलेली आहे.

पहिल्या दिवशीची कमाई

या चित्रपटात कॉमेडी ड्रामा तर आहे, त्यासोबत स्मगलिंग, चोरी आणि सस्पेन्स देखील दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने चांगला व्यवसाय केलेला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8.75 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे.

दुसऱ्या दिवशी 10 कोटीपेक्षा अधिक कमाई होण्याची अपेक्षा | Crew Movie Box Office Collection

या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी खूप चांगली कमाई केलेली आहे. गुड फ्रायडेला सुट्टी असल्याने या चित्रपटाला चांगला फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे सलग शनिवार आणि रविवार येत असल्याने या चित्रपटाची कमाई चांगली होऊ शकते. असा अनेकजण अंदाज व्यक्त करत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी 10 कोटींवर अधिक कमाई होऊ शकते. असा देखील अनेकजण अंदाज लावत आहेत.

त्याचप्रमाणे 3 दिवसात हा चित्रपट (Crew Movie Box Office Collection) 30 कोटींच्या आसपास जाईल, असे देखील अनेकजण म्हणत आहेत. या चित्रपटाचे बजेट 40 ते 50 कोटी दरम्यान आहे. परंतु या मान्याने हा चित्रपट खूप चांगली कमाई करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच तब्बू, करीना आणि क्रिती सेनन एकत्र काम करत आहेत. त्यांनी देखील या चित्रपटात काम करताना त्यांचा अनुभव सांगितला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.