मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियानं इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 151 रननं दणदणीत विजय मिळवत सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टेस्ट सीरिजला 25 ऑगस्टपासून होणार आहे. दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी विराट कोहलीच्या एका निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाचा प्रमुख स्पिनर आर. अश्विनला अजूनपर्यंत एकाही टेस्टमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे विराटला अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे.
विराटच्या जागी टीम मॅनेजमेंटनं रविंद्र जडेजाला संधी दिली आहे. जडेजानं या मालिकेत चांगली बॅटिंग केली असली तरी बॉलिंगनं निराश केलं आहे. त्यानं 44 ओव्हर बॉलिंग केली. पण त्याला एकही विकेट मिळालेली नाही. लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी विजय मिळवून दिला. तिथंही जडेजा संघर्ष करताना दिसला. त्यामुळे लीडस टेस्टमध्ये अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
रविंद्र जडेजानं इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. तर आर. अश्विननं न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अश्विनने सरेकडून कौंटी मॅच खेळताना 7 विकेट्स घेत त्याचा फॉर्म सिद्ध केला होता. त्यामुळे जडेजाच्या जागी अनुभवी अश्विनला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.