Cricket World Cup : यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात सर्वत्र क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup) चर्चा सुरु आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एका धर्मासारखा मानला जातो. त्यातच भर म्हणजे मायदेशात हा वर्ल्डकप होत असल्याने चाहत्यांना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय संघाने आपले पहिले तिन्ही सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यात असे काही खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी यंदाची विश्वचषक स्पर्धा शेवटची असेल. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांचाही समावेश आहे. चला जाणून घेऊया यांच्या व्यतिरिक्त अजून कोणते खेळाडू आहेत.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

१) रवींद्र जडेजा-

रवींद्र जडेजा हा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात भारतीय संघासाठी तो उपयुक्त ठरतो. परंतु सध्या जडेजाचे वय 34 वर्ष आहे. अष्टपैलू असल्याने तिन्ही आघाडीवर काम करताना शरीराचा फिटनेस राखण सुद्धा तारेवरची कसरत असते. पुढील विश्वचषक २०२७ मध्ये होणार आहे. त्यावेळी रवींद्र जडेजाचे वय 38 वर्षे असेल. या वयात खेळणे रवींद्र जडेजासमोर मोठे आव्हान असेल. त्यामुळे कदाचित या वर्षीची विश्वचषक स्पर्धा जडेजासाठी शेवटची ठरेल.

R. Ashwin
R. Ashwin

२) आर. अश्विन – (Cricket World Cup) 

भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण 36 वर्षीय अश्विन अजूनही खेळतोय आणि भारतासाठी दमदार कामगिरी करतोय. यानंतर पुढील विश्वचषक २०२७ मध्ये होणार आहे. त्यावेळी रविचंद्रन अश्विन 40 वर्षांचा असेल. अशावेळी एका गोलंदाजाला फिटनेस सांभाळणं सोप्प नसेल. त्यामुळे यंदाचा वर्ल्डकप अश्विन साठी अखेरचा ठरू शकतो.

virat kohli
virat kohli

३) विराट कोहली :

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ए. बी. डिव्हि्लीअर्सने भाकीत केलं होते कि, विराट कोहली भारतात होणाऱ्या 2023 च्या वर्ल्ड कप नंतर क्रिकेट मधुन निवृत्ती घेणार घेऊ शकतो. भारत जर 2023 चा वर्ल्ड कप जिकण्यात यशस्वी ठरला तर विराट कोहली ही उत्तम संधी साधून क्रिकेट मधली आपली निवृत्ती घोषित करू शकतो. कोहलीचे वय सध्या ३४ आहे. पुढील विश्वचषक स्पर्धेवेळी त्याचे वय ३८ असेल, त्यामुळे त्याची पुढील विश्वचषक स्पर्धेत (Cricket World Cup) खळण्याची शक्यता कमीच आहे.

rohit sharma
rohit sharma

 

४) रोहित शर्मा –

भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा सुद्धा या यादीत आहे. सध्या रोहित शर्मा 36 वर्षाचा आहे. त्यामुळे पुढील वर्ल्ड कपच्या वेळेस तो 40 वर्षाचा होईल. रोहित तोपर्यंत किती फिटनेस राखेल हे सांगता येत नाही. त्यामुळे रोहित शर्मासाठी हा अखेरचा वर्ल्ड कप ठरू शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेट प्रेमींचे आवडते खेळाडू असल्याने यंदाची विश्वचषक स्पर्धा (Cricket World Cup) भारतीय चाहत्यांसाठी भावनिक क्षण असेल.