Wednesday, February 8, 2023

तारळे भागात तीन पानी जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर गुन्हा

- Advertisement -

कराड | धनगरवाडी (ता. पाटण) येथे तीन पानी जुगार खेळणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारळे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोख रक्कम 20 हजार 850 रूपये, मोबाईल व जुगारातील साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मौजे धनगरवाडी (ता. पाटण) गावचे हद्दीतील सार्वजनिक समाज मंदिरासमोरील मोकळ्या जागेत काही लोक तीन पाणी पत्त्याचा डाव खेळत बसले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर दि. 20 रोजी रात्री 8. 40 वा. अचानक छापा घातला असता, तेथे काही इसम हातामध्ये पत्ते घेवुन तीन पानी पत्त्या पैशावर खेळत बसलेले आढळून आले. शामराव गणपती मोरे (वय- 75 वर्षे), चंद्रकांत श्रीरंग सराटे (वय- 57 वर्षे), रमेश शामराव मोरे (वय- 44 वर्षे), नथुराम गणपत मोरे (वय- 66 वर्षे), शिवाजी बजरंग साळुंखे (वय- 52 वर्षे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

वरील संशयितांकडून मोबाईल, रोख रक्कम 20 हजार 850/- रूपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी प्रफुल्ल अंकुश पोतेकर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अधिक तपास नंदू निकम हे करित आहेत.