तरुणीस पळवून विनयभंग करणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा आरोप असलेल्या अमोल करे या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातवळेकर यांनी सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली. आरोपीला भा.द.वि.सं.कलम ३५४-ड आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा न्यालयाने दोषी आढळल्यावर दिली.

सदरचा गुन्हा १ डिसेंबर २०१६ रोजी घडला होता. यातील पीडित मुलगी हि झरे येथील जवाहरलाल नेहरू कनिष्ठ विद्यालयात १२ वीत शिकत होती. ती सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर सायकलवरून घरी येत होती. त्यावेळी अमोल हा त्याच्या दोन मित्रांसह चारचाकी घेऊन रस्त्यावर त्या मुलीची वाट पाहत उभा होता. ती मुलगी अमोलच्या चारचाकीजवळ येताच त्याने तिचा हात पकडून जबरदस्तीने चारचाकीत बसवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यादरम्यान त्याच रस्त्यावरून दोनजण येत असल्याचे पाहून अमोलने त्या मुलीला त्याचठिकाणी सोडून मित्रासह चारचाकी घेऊन पळून गेला.

त्यानंतर ती पीडित मुलगी घरी आली. तिने हि घटना वडिलांना सांगितली. त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात येऊन अमोलच्याविरोधात फिर्याद दिली. त्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक देडे यांनी केला. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला. साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवले. आरोपीच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सर्व साक्षी पुराव्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावली.

 

Leave a Comment