धक्कादायक! रुग्णवाहिकेने चार जणांना उडवले भिवंडी – कल्याण रोडवरील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी प्रतिनिधी | भिवंडी – कल्याण रस्त्यावर अप्सरा टॉकीज समोर सुसाट वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला चालत जाणाऱ्या चार निष्पाप लोकांना उडवले. ही घटना काल संध्याकाळी घडली.

या अपघातामध्ये दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. जखमींना तातळीने जवळच्या रुग्णलयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. दरम्यान संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी रुग्णवाहिकेची तोडफोड करण्याचा प्रयन्त केला. मात्र रुगवाहिका न थांबताच सुसाट वेगाने निघून गेली. रुग्णवाहीका आणि चालकाचा शोध वाहतूक पोलीस घेत आहेत .

Leave a Comment