चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई एसीबीच्या जाळयात; लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
गुन्हयात मदत करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव गणपती पोवार वय ४५ रा. महागाव ता. गडहिंग्लज याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई सोमवारी सकाळी झाली. याबातची फिर्याद २६ वर्षीय युवकाने दिली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या वडीलांवर चंदगड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस हवालदार महादेव पोवार यांच्याकडे होता. सदर गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी पोवार यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ८ हजार रूपये देण्याचे ठरले. याविषयी तक्रारदाराने पोवार यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची दखल घेत सोमवारी सापळा लावण्यात आला होता. या सापळयात पोवार हे लाच घेताना सापडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग कोल्हापूरचे पोलीस उपअधिक्षक अदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस नाईक शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, पोलीस काॅन्सेस्टेबल मयूर देसाइ, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com