अर्णब गोस्वामींचा उपद्रव पाहता पोलिसांनी अटकेसाठी केलं होतं ‘असं’ जबरदस्त प्लॅनिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रिपब्लिक टीव्हीचे मुख्यसंपादक (Editor-in-chief) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करण्यात आली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्यागृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील राज्याच्या गृह विभागाने अर्णब यांच्या अटकेसाठी कोंकण रेंजचे आयजी संजय मोहिते यांच्या नेतृत्वात 40 सदस्यांची उच्च स्तरीय टीम तयार करण्यात आली होती.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्णब यांच्या अटकेची योजना मोहितेंनी तयार केली होती. तर हाय प्रोफाईल एनकाउंटर स्पेशालिस्ट सचिन वाजे यांच्याकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कॅबिनेटमधील एका वरिष्ठ सदस्याने सांगितले, ‘अर्णब प्रचंड शक्तिशाली पत्रकार आहे. अशात मोहिते यांच्या नेतृत्वातील चमूसाठी हा प्लॅन प्रत्यक्षात आणणे अत्यंत आव्हानात्मक होते. अम्ही अत्यंत सावधगिरीने काम करत होतो. चिथावण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरही चमूतील प्रत्येक सदस्याने सय्यम बाळगला.’

…तर अर्णबने शहर सोडतं पळ काढला असता
त्यांनी सांगितले, की ‘या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासातच, आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात अर्णबही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. हे एक सीक्रेट मिशन होते. आमच्या लोकांनी अर्णबच्या इमारतीला अनेक चकरा मारल्या. ही गोष्ट लिक झाली, तर अटकेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अर्णब शहरही सोडू शकतात,’ याची आम्हाला भीती होती.

प्रत्येक छोट्या गोष्टीचं बारकाईनं केलं होतं प्लॅनिंग
या ऑपरेशनसाठी अगदी पूर्णपणे तयारी करण्यात आली होती. छोट्यातल्या छोट्या गोष्टींवरही लक्ष्य ठेवण्यात आले होते. दरवाजा कोन वाजवणार? हेही निश्चित करण्यात आले होते. एवढेच नाही, तर अर्णब आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कोण बोलेल, विरोध झाल्यास कशा पद्धतीची अॅक्शन करण्यात येईल, अर्णब यांनी प्रतिकारही केला. वाजे यांनी त्यांना तपासात सहकार्य न करण्यासंदर्भातील कायदेशीर पैलूही समजावले. सर्वकाही आरामात पार पडले. मात्र, तरीही अर्णबने पोलिसांशी बराचं वेळ हुज्जत घातली. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने उचलत आपल्या ताब्यात घेत पुढील कारवाई केली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment