अखेर अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. (Supreme Court grant interim bail to Arnab Goswami) सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अंतरिम जामीनासाठीचा अर्णव गोस्वामींचा अर्ज नामंजूर करणं, ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. (Arnab Goswami petition in Supreme Court )

अर्णवसह नीतिश सारडा आणि फिरोझ शेख यांनाही सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सकाळी 11 वाजता सुरु झालेली सुनावणी 4.15 पर्यंत सुरु होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले. मुंबई हायकोर्ट व्यक्तीच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले, असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं.

हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींना जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. हरीश साळवेंनी युक्तिवाद करताना “अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करुन आत्महत्या केली”, असा आरोप केला. हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींविरुद्ध सूड भावनेने कारवाई होत असल्याचेही न्यायालयात सांगितले. महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या चर्चेचा आणि इतर प्रकरणांचा दाखला साळवेंनी दिला.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment