पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला सायबर चोरट्यांचा गंडा; ३ कोटी लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु त्याच माध्यमाचा वापर करू घटल्याजाणार्या दरोड्यांवर मात्र आळा घालण्यात आपण अपयशी ठरत आहोत. या सायबर हल्लखोरांच्या जाळ्यात पु. ना. गाडगीळ अँड सन्स ही कंपनी अडकली आहे. या कंपनीच्या महासिक्युअर अ‍ॅपमध्ये सायबर चोरट्याने लॉगइन करत पासवर्ड बदलून त्यांच्या १२ बँक खात्यातून तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये लंपास केले आहेत. ही घटना ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी आदित्य अमित मोडक (वय २८, रा. महात्मा सोसायटी, कोथरुड) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ नोव्हेंबरपर्यंत सुरु होता. याबाबत पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या वतीने कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी आदित्य मोडक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत १९ बँक खाती निष्पन्न झाली आहे. त्यांनी चौकशी केल्यानंतर आता सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सायबर चोरट्यांनी पु. ना. गाडगीळ यांच्या बँक खात्यातून २० बँक खात्यात ट्रान्सफर केली आहे. पु. ना. गाडगीळ अँड सन्स कंपनीचे महासिक्युअर अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व बँक व्यवहार केले जातात. सायबर चोरट्यांनी सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी दुकानाला सुट्टी असताना या महासिक्युअर अ‍ॅपचा पासवर्ड प्राप्त करुन त्यात लॉगइन केले. त्यानंतर त्याचा पासवर्ड बदलला. त्यानंतर या अ‍ॅपच्या सहाय्याने त्यात १९ खाती समाविष्ट केली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण १२ बँक खात्यातून त्यांनी १९ खाती व आणखी एक खाते अशा २० खात्यांवर तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान  या खात्यातून हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले आहे.

Leave a Comment