सुभाष बुवा खूनप्रकरणातील फरारी आरोपीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

संजयनगर येथील बांधकाम साहित्याचे विक्रेते आणि भाजपचे कार्यकर्ते सुभाष बुवा यांच्या खूनप्रकारणातील फरारी असलेला पाचवा संशयित आरोपी सद्दाम अलमेल याला संजयनगर पोलिसानी अटक केली आहे. त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सद्दामच्या अटकेमुळे या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ५ झाली आहे. सुभाष बुवा यांच्या खूनप्रकरणी पोलिसानी आतापर्यंत इम्रान बंडूलाल शेख, रफिक बबलू शेख, उस्मान उर्फ बबलू मोहिद्दीन अलमेल, अमीर मोहिद्दीन अलमेल या चौघाना अटक केली आहे.

बुवा यांचा गेल्या शनिवारी धारधार कुकरी व कुऱ्हाडीने २४ वार करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी सुभाष बुवा यांचा मुलगा प्रीतम याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यापूर्वी पोलिसानी   चौघांना अटक केली होती. त्यापैकी दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने ते न्यायालईन कोठडीत आहेत.या प्रकरणाचा अधिक तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील हे करीत आहेत.

Leave a Comment