लॉकडाऊनमुळे धंद्याला फटका बसल्याने कराड तालुक्यातील व्यावसायिकांची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लॉकडाऊनमधील काळात व्यवसायला मोठा फटका बसल्याने वसंतगड येथील व्यावसायिकाने राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मारूती एकनाथ चव्हाण (वय- 55, सध्या रा. वसंतगड, मूळ रा. पश्‍चिम सुपने, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्याचे नांव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पश्‍चिम सुपने येथील मारूती चव्हाण यांचा कापड व्यवसाय गेली 15 वर्षे वसंतगड येथे आहे. परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन पासून माझा धंदा लॉसमध्ये गेल्यामुळे अर्थिक अडचणीमुळे मी माझे जीवन संपवत आहे. तरी माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये ही नम्र विनंती मला माफ करा अशा मजकूरांची चिठ्ठी मारूती चव्हाण यांच्या खिशात सापडलेली आहे.

दरम्यान, व्यावसायाला फटका बसल्याने त्यांनी घराजवळ असलेल्या एका झाडाला सिमेंटच्या पाईपवर चढून गळफास घेतला. सदरची घटना शुक्रवारी सकाळी लोकांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस हवालदार श्री. कांबळे करत आहेत.

Leave a Comment