चंद्रभागा नदीत बुडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू; मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या एका भाविकाचा चंद्रभागा नदी पात्रात बुडून मुत्यृ झाल्याची खबळजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली आहे. विनोद गायकवाड असं या भाविकाच नाव आहे. पोलिसांनी या भाविकांचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात असणाऱ्या पळसा गावातील विनोद गायकवाड हे पंढरपूरला विठठल रुख्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर गायकवाड हे चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने एका खोल खड्ड्यात बुडून त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

गायकवाड यांच्याकडे बराच वेळ कोणाचेच लक्ष न गेल्याने त्यांना कोणीही मदत करू शकले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. तसेच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत आहे. त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे पडले असल्याने या घटना वारंवार घडत आहेत. असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या घटना थांबवायच्या असतील तर नदीपात्रातील वाळू माफियांना लगाम लावणे गरजेचे आहे. अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिक करत होते.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment